प्रिय,
ज्ञाती बांधव आणि भगिनी व इतर लहानथोर आप्तेष्टांना

सप्रेम नमस्कार,

"नाईक मराठा मंडळाच्या वतीने मी आपणा सर्वांचे या संकेत स्थळावर स्वागत करतो."

तुम्हा सर्वांशी सर्वार्थाने आणि सर्वांगाने जोडले गेलेले हे संकेत स्थळ म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातील घडामोडीवर आधारित आम्ही राबवित असलेल्या उपक्रमाचे आणि इतर मौलिक कार्याच्या संपर्काचे केंद्र स्थान आहे.

आज जगाच्या पाठीवर दूरवर कुठेही असलेले आमचे ज्ञाती बांधव व इतरांपर्यंत आपल्या विचारांची व कार्याची देवाणघेवाण करून आपल्या अतूट नात्याची जाण कायम ठेवण्याचा हा खटाटोप....!

आजच्या आपल्या प्रगतशील देशात आपल्या प्रत्येक जणांची या ना त्या कारणाने वैयक्तिक विकासासाठी भ्रमंती होत असते. अशा या वेगवान बदलत्या काळात एकमेकांशी संपर्क आणि समाजात होत असलेल्या घडामोडींची माहिती असणे अत्यावश्यक आहे. अशावेळी आपले आप्तेष्ट, इतर बांधव आणि आपल्या संस्कृतीशी असलेले नाते, जिव्हाळा, प्रेम या सर्व गोष्टी एकत्र गुंफून आपल्या विचारांची जडणघडण सातत्याने कार्यरत ठेवण्याकरिता आम्ही, "नाईक मराठा मंडळ (www.nmm.co.in)" या मराठी भाषेतील संकेत स्थळाच्याद्वारे, कै. कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या विचारांचा ठेवा आपणापर्यंत पोहचविण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.

आपण सर्वांनी नियमित या संकेत स्थळाला भेट देवून तसेच आपल्या कार्याच्या आणि विचारांच्या साथीने ही संस्था पुढे यशस्वी करण्याच्या आमच्या उद्दिष्टात आपण आपले भरघोस साहाय्य कराल अशी अपेक्षा बाळगतो.

"आपले मौलिक विचार आणि सहकार्य हाच आमचा ठेवा....!"

धन्यवाद...!
आपला कृपाभिलाषी

श्री.किशोर गोविंद सातोसकर.
  M.Sc.(Tech)

श्री देवी माउली मंदिर - सोनुर्ली

पारितोषिक

 

 

 

 

आमच्या सर्व ज्ञाती बांधव आणि भगिनी व इतर लहानथोर आप्तेष्टांना येणाऱ्या २०१५ साकरिता हार्दिक शुभेच्छा आणि या अवधीतील येणारा सर्व काळ आरोग्यदायी, सुखसमृद्धी आणि भरभराटीचा जावो हि ईश्वर चरणी प्रार्थना.. !